घरनवी मुंबईRaigad News : ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना राज्यस्तरीय संपादक पुरस्कार जाहीर

Raigad News : ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना राज्यस्तरीय संपादक पुरस्कार जाहीर

Subscribe

यंदाच्या संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा माथेरान प्रेस क्लबने केली आहे. यात ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना 25 एप्रिल रोजी माथेरानमधील कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नेरळ : यंदाचा संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. 25 एप्रिल रोजी माथेरानमध्ये ही पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. माथेरान प्रेस क्लबने या पुरस्काराची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख असणार आहेत. तर मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र अंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

माथेरानस्थित संतोष पवार यांचा पत्रकार म्हणून राज्यात वावर होता. कोरोनाच्या संसर्गात 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर माथेरान प्रेस क्लबने 2021 पासून संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सुरू केला. ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Fort Ropeway : शिवप्रेमींच्या सेवेत रोपवेची चौथी ट्रॉली

महेश म्हात्रे यांच्यासोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांना सुनील दांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि माथेरानचे पत्रकार अजय कदम यांना धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ संपादक संजय आवटे, ज्येष्ठ संपादक विनायक पात्रुडकर आणि ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले यांना गौरवण्यात आले आहे. माथेरानमधील प्रिती हॉटेलमध्ये 25 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

हेही वाचा… Raigad Water Crisis : गाळमुक्त शार्लोट तलाव केवळ स्वप्नच!

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ निवेदक भूषण करंदीकर करणार आहेत. तर मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, प्रेरणा सावंत, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अॅड. कैलास मोरे आदी पाहुणे या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -