घरताज्या घडामोडीMNS : मनसे महायुतीत सहभागी होणार? उद्या चित्र स्पष्ट होणार, बाळा नांदगावकरांची...

MNS : मनसे महायुतीत सहभागी होणार? उद्या चित्र स्पष्ट होणार, बाळा नांदगावकरांची महत्त्वाची माहिती

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. गुरूवार 28 मार्च रोजी महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा घटक पक्ष असणार की नाही हे देखील उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. गुरूवार 28 मार्च रोजी महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा घटक पक्ष असणार की नाही हे देखील उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या काही तासाभरात मनसे पक्ष लोकसभेची लढाई स्वतंत्र लढणार की महायुतीत सहभागी होणार हे स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (lok sabha mns raj thackeray mahayuti bala nandgaokar shiv sena congress ncp)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुढीपाडव्याच्या सभेबाबात चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच, मनसे महायुतीत सहभागी होणार का, याबाबतही माहिती दिली. “आम्ही महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी 3 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या दोन जागांसाठी चर्चा सुरु आहे. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पक्षप्रमुख ठरवतील”, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

- Advertisement -

शिवाय, “आजची आमची बैठक फक्त गुढी पाडावा मेळाव्यासंदर्भात होती. जी माहिती तुम्हाला हवीय, त्यासाठी तुम्ही थोडी प्रतिक्षा करा. राजकारणात ज्याच्याकडे संयम आहे, तो पुढे जातो. दोन-चार दिवसात या प्रश्नांची उत्तर मिळतील” असं बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे शिवसेनेमध्ये विलीन होऊन राज ठाकरे प्रमुख होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे मीडियामध्ये ही चर्चा आहे. या बाबत चर्चा झाली असेल, तर पक्षप्रमुखांना या बद्दल माहिती असेल. या विषयावर आमच्याशी बोलण झालेलं नाहीय”, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण अजूनही मविआ आणि महायुतीकडून राज्यातील जागा वाटप पूर्णपणे जाहीर झालेलं नाही. काही जागांवरुन मविआ आणि महायुतीमध्ये मतभेद कायम आहेत. ठाकरे गटाने आज राज्यातील 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार नसून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA : सांगली, ईशान्य मुंबई जागेवरून मविआत धुसफूस; ठाकरेंना फेरविचार करण्याची विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -