घरमहाराष्ट्रLoksabha 2024: श्रीनिवास पाटील यांची माघार; शरद पवार करणार नव्या उमेदवाराची घोषणा

Loksabha 2024: श्रीनिवास पाटील यांची माघार; शरद पवार करणार नव्या उमेदवाराची घोषणा

Subscribe

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीचं कारण देत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत साताऱ्यातून शरद पवार गटाकडून नवीन उमेदवार दिला जाणार आहे, अशी माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर आणि सारंग श्रीनिवास पाटील ही नावं चर्चेत आहेत. (Loksabha 2024 Srinivas Patil withdraws Sharad Pawar will announce the new candidate in two days)

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीने साताऱ्याच्या जागेवर सखोल चर्चा केली. साताऱ्याशी यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. सातारा हा जिल्हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथला निर्णय काळजीपूर्वक व्हायला हवा, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

श्रीनिवास पाटील यांची कामगिरी चांगली होती. त्यांनी संसदेत चांगलं काम केलं. त्यांनी विकासाची कामं प्रामाणिकपणे केली. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत पुन्हा उभं राहावं, असं सर्वांचं म्हणणं होतं. परंतु प्रकृतीचा विचार करता, त्यांनी निवडणुकीसाठी नकार दिला आहे.

(हेही वाचा: Raut VS Ambedkar : आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या; वंचितच्या नाराजीवर राऊतांची भूमिका)

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -