घरमहाराष्ट्रRaut VS Ambedkar : आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या; वंचितच्या नाराजीवर राऊतांची...

Raut VS Ambedkar : आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या; वंचितच्या नाराजीवर राऊतांची भूमिका

Subscribe

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला आहे. मात्र यानंतर ते वारंवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. संजय आघाडीत बिघाड करत आहेत आणि महाविकास आघाडीची चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप केला आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या, परंतु मविआतून कोणी खोटं बोलतं असं मला वाटत नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut VS Prakash Ambedkar Let Prakash Ambedkar beat me Sanjay Rauts role on the displeasure of the deprived)

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सन्मानानं वागवलं हे सर्वांना माहित आहे. त्यांना 4 जागांचा प्रस्ताव होता. अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता. त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यामान जागाही त्यांना द्यायला तयार होतो. रामटेक ही आमची सीटींग सीट आहे. आम्ही त्या जागेचाही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेसकडून त्यांना एक चांगली जागा देण्यात येत होती. त्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत होत्या. एका बैठकीला उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हजर होते. चर्चा माझ्यात आणि त्याच्यात होत नव्हती. चर्चा महाविकास आघाडीत होत होती, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की, तुम्ही खोटं बोलत आहात. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे लोकं संविधान संपवू इच्छितात त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल, असं कोणी वागू नये, या मताचे आम्ही आहोत. आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहे. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असायलाच हवी, ही आमची भूमिका आहे. यात खोटं काहीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, महाविकास आघाडीतलं कोणी खोटं बोलत आहे. याशिवाय शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडायचं तर फोडू द्या

महाविकास आघाडीत यायचं नाही म्हणून प्रकाश आबंडेकर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नावर बोलताना संजय म्हणाले की, माझं असं काहीच म्हणणं नाही. ते अत्यंत विद्वान नेते आहेत. त्यांना या देशातील हुकूमशाही नष्ट करायची आहे. त्यांना संघर्ष करायचा आहे. त्यामुळे त्यांना आघाडीत यायचं नाही असं मी म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना माझ्यावर खापर फोडायचं आहे तर फोडू द्या, असं उत्तर संजय राऊत यांनी अन्य एका प्रश्नाला दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -