घरमहाराष्ट्रदहा रूपयांमध्ये रोज दुपारी मिळणार भरपेट जेवण

दहा रूपयांमध्ये रोज दुपारी मिळणार भरपेट जेवण

Subscribe

अंबरनाथमधील कामगार वस्तीमध्ये मानवसेवा ट्रस्टचा उपक्रम

गोरगरिबांना मदत करणे हीच खरी ईश्वारसेवा मानून कार्यरत असणाऱ्या अंबरनाथ येथील मानवसेवा ट्रस्ट या संस्थेने कामगार दिनापासून पश्चिम विभागातील गावदेवी मंदिराच्या प्रांगणात दुपारी १२ ते २ यावेळेत अवघ्या दहा रूपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून औद्योगिक नगरी असा लौकिक असणाऱ्या अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. परिसरातील अनेक कुटुंबांचे हातावर पोट असल्याने रोजची कमाई झाली नाही, तर काहींना नाईलाजाने अर्धपोटी रहावे लागते.

महागाईच्या या काळात दोन वेळचे अन्न मिळविणेही काही कुटुंबांना शक्य होत नाही. त्यांना किमान एकवेळ किफायतशीर दरात पोटभर अन्न मिळावे, अशी संकल्पना मानवसेवा ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मांडली. मानवसेवा ट्रस्टच्या सर्व सभासदांनी तसेच शहरातील इतर प्रतिष्ठितांनी ती उचलून धरली. या योजनेला सक्रीय पाठींबाही दिला. त्यातूनच कामगार दिनापासून ही योजना प्रत्यक्षात आणण्यात आली.

- Advertisement -

जेवणाचा दर्जा उत्तमच अशी ग्वाही

व्यापारी संघटनेचे खानजी धल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटनाच्या दिवशीचे जेवण प्रायोजित केले होते. दहा रूपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या या जेवणाचा दर्जा कायम उत्तमच असेल, अशी ग्वाही यावेळी ट्रस्टच्या सदस्यांनी दिली.
शहरातील नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला यथाशक्ती मदत करावी, त्यातून हा अन्नयज्ञ अखंडपणे सुरू राहण्यास मदत होईल, असे आवाहन अरविंद वाळेकर यांनी याप्रसंगी बोलताना केले. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, विश्वानाथ पनवेलकर, संजय दलाल, दत्ता घावट, गुणवंत खरोदिया, सुभाष साळुंके, रमेशचंद्र पटेल आदी याप्रसंगी उपस्थित होते.

अशी आहे योजना

साधा डाळभात किंवा खिचडी करायची म्हटली तरी प्रतिमाणशी २० ते २२ रूपये खर्च येतो. त्यातील दहा रूपये त्या व्यक्तीकडून घेतले जातील. उर्वरित खर्च दात्यांनी दिलेल्या देणग्यांमधून भागविण्यात येणार आहे.

- Advertisement -

लवकरच पूर्व विभागातही केंद्र

पश्चिम विभागाप्रमाणेच पूर्व विभागातील शिवाजी चौकातही लवकरच दहा रूपयांमध्ये जेवण ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्व विभागातील गोरगरीबांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -