घरमहाराष्ट्रप्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नाही

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नाही

Subscribe

दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.

राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरम्यान, महाराष्ट्राकडून रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या प्रवासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव होतो. पण, तो केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही. त्यामुळे राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरवेळी आळीपाळीनुसार काही राज्यांना संधी मिळते. २०१६ साली सुद्धा राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता आणि यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.

दरवर्षी ठराविक राज्यांना दिल्लीत राजपथावर चित्ररथाकरता संधी मिळते. यावेळी १६ राज्ये आणि ६ केंद्रीय मंत्रालये अशा एकूण २२ चित्ररथांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यावेळी महाराष्ट्राकडून रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या प्रवासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव होता. पण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणे बंगालचाही चित्ररथ नाकारण्यात आला आहे.

- Advertisement -

सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक

‘प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु, सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय’.

- Advertisement -

हा होता बंगालचा चित्ररथ

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुरु केलेल्या कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव बंगालने मांडला होता. पण तो सांस्कृतिक मंत्रालयाकडून नाकारला गेला आहे. तसेच हा बंगालचा चित्ररथ जाणूनबुजून नाकारल्याची टीका बंगालमधील नेत्यांनी केली आहे. बंगाल सरकारने केंद्राच्या नागरिकत्व कायद्याला जोरदार विरोध केल्यामुळेच ही संझी नाकारल्याचा आरोप तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर भाजपाला विजय मिळून देखील विरोधात बसावे लागले आहे. शिवसेनेने मत्र पक्षाची साथ सोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करत भाजपचे सरकार स्थापन करण्याचा मोदी शहांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच यंदाचा पश्चिम बंगालचा चित्ररथ नाकारल्याची टीका केली जात आहे.


हेही वाचा – दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -