घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2021: यामुळे राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला...

Maharashtra Assembly Budget Session 2021: यामुळे राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला – मुनगंटीवार

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session 2021) पहिल्याच दिवशी भाजपाची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. वैधानिक मंडळाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ निर्माण झाला आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांसह भाजप नेत्यांनी सभात्याग केला. ‘महाविकास आघाडी सरकारची नीती आणि खरा चेहरा आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समोर आला,’ असे मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस होऊनही सरकार का काही करत नाही? असा सवाल उपस्थित केला होता. आज याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिले. आम्ही विकास महामंडळ स्थापन करू, याबद्दल काही दुमत असल्याचे कारण नाही. बजेटमध्ये तसा निधीही देऊन. पण ज्यावेळी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करू, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र यानंतर सुधीर मुनगंटीवार बोलत असताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हस्तक्षेप केला आणि मग विरोधकांनी सभात्याग केला.

- Advertisement -

सभात्याग केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक विकास महामंडळला सरकारने वर्षभर मुदत वाढ दिली नाही. जनतेसोबत विश्वासघात केला. सरकार वैधानिक विकास महामंडळाच कवच न देता निधीची तरतूद करत आहे. वर्षभरात या पैशाचा विकासासाठी विदर्भ-मराठवाड्यात उपयोग न होता, हा नसतीच्या माध्यमातून दुसऱ्या विभागात खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन अनुशेष आणि पुन्हा समिती नेमावी लागेल, असं म्हणत आजच्या आजच सरकारे वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी मुनगंटीवार केली आणि त्यानंतर सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सभात्याग केला.’


हेही वाचा – राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा मुद्दा निकाली काढा, मगच विदर्भ, मराठवाड्याला निधी – अजितदादा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -