घरमहाराष्ट्रचक्क आदित्य ठाकरेंनी दिल्या CM शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले, नेहमी आमच्याच...

चक्क आदित्य ठाकरेंनी दिल्या CM शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले, नेहमी आमच्याच…

Subscribe

शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे केवळ महाराष्ट्रातचं नाही तर जगभरात परिचयाचे झाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त काल मध्यरात्रीपासूनचं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिंदेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी करत आहेत. मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबातील कोणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतयं का? याकडे सर्वांच लक्ष होतं.अखेर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी खोचक शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. बिडकीनमधील सभेत जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त थेट शुभेच्छा देणं टाळत नेहमी आमच्या शुभेच्छा सर्वांसोबत असतात. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आज त्यांनी मी काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कधी कुणाचेही वाईट बघतं नाही. आमच्या पाठीत खंजीर खुपसले, पाठीत वार केले असतील तर आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही, नेहमी आमच्या शुभेच्छाा सर्वांसोबत असतात.

दरम्यान मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगतोय. आदित्य ठाकरेंनी अलीकडेचं मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील सभेनिमित्त त्यांना एक आव्हान दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देत वरळीतून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, वरळीतून नाही तर मी ठाण्यात त्यांनी उभं राहावं मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवतो, असं खुलं आव्हान दिलं होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी ही आव्हानं झुगारून लावली. त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी त्यांनी नवं आव्हान दिलं आहे.


हेही वाचा : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -