घरमुंबईकसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार?

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Subscribe

कसबा, चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुका होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी खरी लढत होणार आहे. पण निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केलेले राज ठाकरे यांनी याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पण या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते. असे पत्र सुद्धा राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पाठवले होते. पण याचा काहीही फायदा झाला नाही. त्याउलट या दोन्ही मतदारसंघामध्ये बंडखोरांनी देखील निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.

राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केले होते की, या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुका या बिनविरोध घेण्यात याव्यात. महत्वाचे म्हणजे कसबा मतदारसंघामध्ये मनसेला मानणारा मतदारसंघ होता. त्यामुळे येथून मनसे आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असे सर्वांना वाटत होते. पण मनसेकडून असे करण्यात आले नाही. त्यामुळे आता मनसे या निवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

येत्या सोमवारी आणि मंगळवारी राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचे पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी न होण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीसाठी नेमका कोणाला पाठिंबा देणार की तटस्थ राहण्याची भूमिका घेणार हे अजूनही कळू शकलेले नाही.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर देखील कसबा आणि चिंचवडमध्ये आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. कसबा पेठ मतदारसंघामधून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामुळे या मतदारसंघात आता भाजप आणि काँग्रेससह अपक्ष उमेदवारांचे आव्हान देखील असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

तर, चिंचवड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ज्यामुळे आता या मतदारसंघात सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध अपक्ष असा सामना पाहायला मिळू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -