घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात ३३ हजार ९१४ कोरोनाबाधितांची नोंद, १३ रुग्ण...

Maharashtra Corona Update : राज्यात ३३ हजार ९१४ कोरोनाबाधितांची नोंद, १३ रुग्ण ऑमिक्रॉन पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढली होती. नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. परंतु गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुंबईतील रुग्ण संख्या घटली आहे.

राज्यात मंगळवारी ३३,९१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,६९,४२५ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,०२,९२३ इतकी झाली आहे. राज्यात मंगळवारी ८६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या 1,42,237 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. राज्यात मंगळवारी ३०,५०० रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत ७१,२०,४३६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ओमायक्रॉनचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे मनपा १२, पिंपरी-चिंचवड मनपा १ यांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात २८५८ ओमायक्रॉन रुग्ण सापडले असून, त्यातील १५३४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत चढ उतार सुरुच आहे. राज्यात ३३,९१४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे शाळ सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतल्यानंतर शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला असून १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटली

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढली होती. नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. परंतु गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुंबईतील रुग्ण संख्या घटली आहे. गेल्या २४ तासात १८१५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्यामुळे घरी परतले आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा दर १६१ दिवस झाला आहे.


हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईत आज 1815 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 11 रुग्णांचा मृत्यू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -