Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: नव्या बाधितांच्या संख्येत किंचित घट; १७० बाधितांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: नव्या बाधितांच्या संख्येत किंचित घट; १७० बाधितांचा मृत्यू

राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसली.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी ८ हजार ६०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा जवळपास सहाशेने कमी झाला असून ८ हजार ०१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०७ हजार २०५ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४८,२४,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८९,२५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८१,२६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

१७० जणांचा मृत्यू   

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी बुधवारप्रमाणेच गुरुवारी १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख २६ हजार ५६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

७ हजार ३९१ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -

तसेच राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसली. बुधवारी ६ हजार ६७ रुग्ण बरे झाले होते. तर गुरुवारी ७ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,५२,१९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत असून ते आता ९६.१७ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -