Corona Update : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख पार

coronavirus
कोरोना

राज्यात कोरोनाचा कहर वाढ चालला असून कोरोनाबाधितांच्या रुग्णांनी २ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २९५ जणांना मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ६४ इतका झाला असून आतापर्यंत ८ हजार ६७१ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात शनिवारी नोंदविलेल्या २९५ मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि उर्वरित १७१ पूर्वीच्या कालावधीतील मृत्यूंपैकी १६३ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील रिकॉन्सिलेशनद्वारे नोंदविण्यात आले आहे. या १७१ मृत्यूंमध्ये ठाणे मनपामधील ७०, ठाणे १५, नवी मुंबई ३३, कल्याण डोंबिवली ३२, उल्हास नगर ८, भिवंडी ५, मीरा भाईंदर २, पिंपरी चिंचवड २, सोलापूर ३ आणि लातूर १ यांचा समावेश आहे. शनिवारी ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा –

PUBG च्या नादात पोराने वडिलांच्या खात्यातून उडवले १६ लाख रुपये!