घरमहाराष्ट्रसांगली साधू मारहाण प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन, म्हणाले...

सांगली साधू मारहाण प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन, म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये चार साधूंना मारहाणी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेय, अनेकांनी या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केलीय. दरम्यान या घटनेप्रकरणी आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी रशियावरून फोन करत सविस्तर अहवाल मागवला आहे. फडणवीसांनी फोन करत पोलीस महासंचालकांकडून या मारहाण प्रकरणी चर्चा करत माहिती घेतली आहे. तसेच हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना स्वत: या घटनेकडे लक्ष देण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच या घटनेतील मारेकरी कोण आहेत,या घटनेचा संपूर्ण अहवाल देण्याच्या सूचना फडणवीसांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी रशियावरून परतल्यानंतर पोलीस महासंचालकांकडून सविस्तर माहिती घेतली आहे.

दरम्यान या मारहाणी प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सातही आरोपींना आज जत न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सांगली पोलिस पीडित चारही साधूंच्या संपर्कात असून पोलिसांकडून साधूंचा जबाब नोंदवला जाणार आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना जत तालुक्यातील लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मुलं चोरी करणारी टोळी असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली. कारमधून बाहेर ओढत साधूंना लाथाबुक्क्यांनी, काट्या, पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकूण 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींपैकी आमसिध्दा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत.

काल या मारहाणीची गांभीर्याने दखल घेत सुमोटो पोलिसांनी तक्रार दाखल करत गुन्हे दाखल केला. त्य़ानंतर काही आरोपींना अटक केली असून पोलिसांकडून साधूंचे जबाब पुन्हा नोंदवला जाणार आहे.


नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -