घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांचा पोलिसांना मानाचा मुजरा; पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधा देणार

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना मानाचा मुजरा; पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधा देणार

Subscribe

पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना "मानाचा मुजरा" या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.

महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीदवाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.

मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. या कार्यक्रमात त्यांनी वरील कौतुकोद्गार काढले. तर यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त, असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्विकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले. या संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

प्रथमच संचलनासह मुख्यमंत्र्यांना मानवंदना

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमत्र्यांनी यावेळी दिली. तर बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधाच्या रुपाने पाठबळ दिले जाईल. त्यातून त्यांनी हिम्मत कमवावी अशी अपेक्षा आहे. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येईल. त्यामुळे पोलीस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भूमीपूजन संपन्न

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज

महाराष्ट्र पोलीस दल दरवर्षी २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्र पोलीस दलास या दिवशी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीसांना विशेष दर्जा मिळाला. या ध्वजावर पोलीस दलाचे ‘अभय मुद्रा’ हे बोधचिन्ह म्हणजे उजव्या हाताचा पंजा चित्रांकीत आहे. त्यामध्येच “वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण” या अर्थाचे जनतेला संरक्षणाची ग्वाही देणारे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे संस्कृतमधील पोलीसांचे ब्रीद समाविष्ट आहे.


हेही वाचा – लोकसभेत प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळेंनी मारली बाजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -