घर महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबतची भाजप मला आवडत नाही; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं खळबळ

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबतची भाजप मला आवडत नाही; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं खळबळ

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचं भाजप मला आवडत नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने मात्र खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचं भाजप मला आवडत नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने मात्र खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Politics I dont like BJP with Eknath Shinde and Ajit Pawar BJP leader Sudhir Mungantiwar s statement)

नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?

मला देशसेवा करणारा भाजप आवडतो. कोणी कोणाच्या सोबत असल्यानं अडचणी येत नाहीत. मला प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही पक्ष फोडता? अरे रावणाच्या अत्याचाराविरुद्ध त्यांचे सख्खे भाऊ प्रभी रामासोबत आले तर प्रभू रामाला तुम्ही पक्ष फोडला म्हणून आरोप कराल का? असा उलट प्रश्न करत सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेतील आमदारांना सोबत घेत भाजपसह सत्ता स्थापन केली. या सत्तेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तर, वर्षभराने अजित पवारांनीही महाविकास आघाडीला रामराम ठोकत राष्ट्रवादीतील आमदारांसह भाजपाला समर्थन दिले. त्यामुळे विरोधी बाकावर असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा मिळाला आहे.

याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मला शिंदेंसोबतची भाजप आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर

- Advertisement -

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्या कालच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आता जेव्हा केव्हा चौकशी होईल ना तेव्हा रडायचे नाही. आम्हाला त्रास दिला जातोय असं न म्हणता चौकशीला सामोरे जायचे आणि उत्तरे देऊन त्यातील सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्यायला मदत करायची असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना लगावला.

(हेही वाचा: विरोधकांच्या बॉम्बचं बारूदच गायब; बावनकुळेंचा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना टोला )

- Advertisment -