घरताज्या घडामोडीJobs: दहावी, बारावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी; पगार १८ ते ६१...

Jobs: दहावी, बारावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी; पगार १८ ते ६१ हजार

Subscribe

आजपासून (५ ऑक्टोबर) भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये मोठी भरती सुरु होत आहे. यात पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या बातमीद्वारे आम्ही आपल्याला या पदांसाठी कसा अर्ज करायचा याची माहिती देणार आहोत. तसेच वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसहीत इतर निकष काय आहेत? त्याचीही माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे. भारतीय पोस्ट विभागाने देशातील विविध सर्कलसाठी कामगार भरती सुरु केली आहे. यापैकी महाराष्ट्र सर्कलसाठी इच्छूक उमेदवार दि. ५ ऑक्टोबर पासून ते ३ नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. पदांची संख्या खालीलप्रमाणे –

पद आणि त्यांची संख्या

पोस्टमन – १,०२९

- Advertisement -

मेल गार्ड – १५

मल्टी टास्किंग स्टाफ – ३२

- Advertisement -

मल्टी टास्किंग स्टाफ (सबऑर्डिनेट) – २९५

एकूण पदे – १,३७१

कोण अर्ज करु शकतं?

पोस्टमन आणि मेल गार्ड या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांपर्यंतची आहे. तर मल्टि टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारासांठी वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सुट देण्यात आली आहे.

शिक्षणाचे निकष काय आहेत?

पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्रासाठी १० उत्तीर्ण असाल तरी चालेल. ही भरती महाराष्ट्र आणि गोवासाठी असल्यामुळे मराठी आणि कोकणी भाषा येणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असून तिसऱ्या पेपरमध्ये डेटा एंट्रीची टेस्ट घेतली जाणार आहे.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पदासाठी देखील संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

पोस्टमन पदांसाठी दुचाकीचे लायसन्स असणे आवश्यक आहे. लायसन्स नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या मुदतीत लायसन्स मिळवण्याची अट ठेवण्यात आली आहे.

या पदांसाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊन New User चे अकाऊंट बनवून अर्ज करु शकता. प्रत्येक पदासाठी १०० रुपये ऑनलाईन अर्जाचे शुल्क असेल तर परिक्षा शुल्क ४०० रुपये आहे. एकूण ५०० रुपये एका पदासाठी भरावे लागणार आहे. आरक्षण लागू असणाऱ्या प्रवर्गांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक –
https: //dopmah20.onlineapDlicationform.oro/MHPOST/

पगार काय असेल?

पोस्टमन आणि मेल गार्ड – २१,७०० ते ६९,१००

मल्टी टास्किंग स्टाफ – १८,००० ते ५६,९००

जाहीरात पाहण्यासाठी लिंक – https://www.maharashtrapost.gov.in/300920%20Notification%20PM%20MG%20MTS.pdf

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -