घरदेश-विदेशLive Update : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर

Live Update : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर

Subscribe

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर

गडचिरोली जिल्हयातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

या दौऱ्यात अंबादास दानवे हे गडचिरोली जिल्हा रुग्णालय, आदिवासी शासकीय वस्तीगृह, कन्नडगाव आश्रमशाळा या ठिकाणी भेट देतील.

जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील समस्या व प्रश्नांचा आढावा घेतील.

- Advertisement -

या दौऱ्या दरम्यान तेथील कोणसरी फिल्टर प्लांटची पाहणी देखील करणार आहेत.

आहेरी येथे शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिवसेना आयोजित शिवसंवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावून अंबादास दानवे स्थानिक शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.


सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल – देवेंद्र फडणवीस

भाजपाचा ‘महाविजय 2024’ संकल्प – देवेंद्र फडणवीस

कायद्याचा अभ्यास करून सरकार बनवलं – देवेंद्र फडणवीस

अख्खं सरकार मला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करत होते – देवेंद्र फडणवीस

मविआने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही – देवेंद्र फडणवीस

मविआ सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला  – देवेंद्र फडणवीस


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची रविकांत तुपकर यांच्याशी फोनवरून चर्चा


अनिल देशमुख यांचे नागपूर विमानतळावर जंग्गी स्वागत


स्वाभिमानचे रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


ठाण्याचे माजी उप-महापौर नरेश मणेरांना अटक


कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय


शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न


बुलढाण्यात स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या मोर्चाला सुरुवात


रिफायनरी विरोधकांचा शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूनंतर राजापूरात मोर्चा


पत्रकार वारिसेंच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र


रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह 2 संचालकांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

बँकांची 409 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा


तुर्कस्तान, सीरियातील भूकंपग्रस्त मृतांची संख्या 23 हजार पार


भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची आज बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह निम्याहून अधिक मंत्रिमंडळाची असणार उपस्थिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर

दौऱ्यात मुख्यमंत्री विविध बैठकांना, कार्यक्रमांना लावणार हजेरी


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नवी मुंबई दौऱ्यावर

शरद पवार यांच्या हस्ते देवस्थ मराठा भवनाचं होणार उद्घाटन


उद्योग मंत्री उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर

उद्योग विभागाची आढावा बैठक घेत औद्योगिक संघटनांसोबत करणार चर्चा


विरोधी पक्ष नेते अजित पवार औरंगाबादच्या दौऱ्यावर

अजित पवार दौऱ्या दरम्यान शेतकरी मेळाव्याला करणार मार्गदर्शन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -