घरमहाराष्ट्रआगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

Subscribe

संजय राऊत यांचे सूतोवाच

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून राज्यात होणार्‍या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असे सूतोवाच शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘एकत्र निवडणूक लढलो तर पदवीधर निवडणुकीप्रमाणे महापालिकांचे निकाल लागतील. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे त्या पक्षाकडे नेतृत्व सोपवू’, असे राऊत म्हणाले.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांनी ही माहिती दिली.‘जमेल तिथे आणि शक्य असेल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढवू. एकत्र निवडणुका लढल्याने काय निकाल लागतात हे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये पाहिले त्यामुळे अशाच प्रकारचे निकाल महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये लागावे, अशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे आणि मानसिकता आहे. आमच्यामध्ये कोणतीही खेचाखेची नाही. महाराष्ट्रीतील सत्ता पाच वर्षांसाठी राहील, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि तसेच सत्तेचे वाटप केले जाईल. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, तिथे त्यांना नेतृत्व द्यावे, असे ठरले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे. तर पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करू. पुण्यात दोन जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीत एक जागेवर राष्ट्रवादी लढेल तर दुसर्‍या जागेवर शिवसेना लढेल, असं संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -