घरताज्या घडामोडी'पद्म पुरस्कारा'साठी संजय राऊतांच नाव केंद्राने केलं रिजेक्ट

‘पद्म पुरस्कारा’साठी संजय राऊतांच नाव केंद्राने केलं रिजेक्ट

Subscribe

पद्मश्री पुरस्कारसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच नाव महाविकास आघाडी सरकारकडून शिफारस करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा सोमवारी केली. यंदा ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार असे एकूण ११९ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्यश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कारसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला तब्बल ९८ मान्यवरांच्या नावाची शिफारस केली होती. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेही नाव शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने २०२१चे पद्म पुरस्कार एकूण ११९ मान्यवरांना जाहीर केले. यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाठवण्यात आलेली ९८ नावांच्या यादीमध्ये एका नावाव्यतिरिक्त इतर सर्व नावांवर केंद्राने फूली मारली. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी सरकारकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांपैकी फक्त अनाथांची आई बनून त्यांना नवे जीवन देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार जाहीर केला.

- Advertisement -

पद्म पुरस्कारासाठी ‘या’ नावाची केली होती शिफारस

पद्मविभूषण पुरस्कारासाठी महाविकास आघाडी सरकारकडून मुकेश अंबानी, सुनील गावस्कर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. तर पद्मभूषण पुरस्कारसाठी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, सीरम इन्स्टिट्यूटचे ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडाव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू आणि डॉ. मिलिंद कीर्तने या मान्यवारांची नावे देण्यात आली होती. तसेच पद्मश्री पुरस्कारसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यशवंत गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, पत्रकार मधुकर भावे यांच्या नावाची शिफारस केली होती. पण केंद्र सरकारने या नावांचा विचार न केल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह चार जणांना पद्म पुरस्कार घोषित

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -