घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ पुढील ८ दिवस बंद

नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ पुढील ८ दिवस बंद

Subscribe

सर्वपक्षीय नगरसेवकांसह व्यापारी व हॉकर्स असोसिएशनचा निर्णय

नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड, रविवार कारंजा, कापड बाजार, जुने नाशिक, दहीपूल, कानडे मारुती लेन, दुधबाजार, एमजी रोड परिसरासह प्रमुख बाजारपेठा रविवार (दि. २१) पासून पुढील रविवार (दि. २८) स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी तसेच हॉकर्स असोसिएशनच्या शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
शहरातील पंचवटी, जुने नाशिक, द्वारका, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आदी भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून जरी बंदबाबत निर्णय घेतला जात नसला, तरी नागरिकांसह सर्वपक्षीय नगरसेवक व विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यात खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, जुने नाशिक परिसर पुढील आठ दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत.
शनिवारी झालेल्या बैठकीस भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, माजी महापौर विनायक पांडे, राजेंद्र बागूल, यतिन वाघ, संदेश फुले यांच्यासह मेनरोडचे व्यापारी आणि हॉकर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विक्रेते उपस्थित होते.

किराणा दुकानेही राहणार बंद

किराणा व्यापारी असोासिएशननेदेखील या संपात सहभाग घेतला असून, रविवार कारंजा, जुने नाशिक, अशोक स्तंभ भागातील किराणा दुकानेही या काळात बंद राहणार आहेत.
– प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, किराणा व्यापारी असोसिएशन, नाशिक

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

3 प्रतिक्रिया

  1. देर आये दुरुस्त आये खूप कमाऊन झाले आता भरल्या पोटी तत्व ध्यान सांगायला काय हरकत आहे ? इतके दिवस हे नगरसेवक कुठे होते

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -