घरमहाराष्ट्रपुण्यात पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरुच!

पुण्यात पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरुच!

Subscribe

पुण्यात पोलिसांना मारहाण करणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे-मुंबई जुना महामार्गावर या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांना मारहाण करणारे हे आरोपी एका पोलीस उपनिरीक्षकाचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना पुणे-मुबंई जुना महामार्गावरही अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ही घटना दापोडी पोलीस चौकीच्या शेजारीच घडली आहे. या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली असून या घटनेत पोलीस कर्मचारी नाईक नरवडे हे जखमी झाले आहेत. आरोपी रवींद्र दादाराव कोंडगे, वैजनाथ दादाराव कोंडगेसह पाच इसमांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे सर्व आरोपी पिंपरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ट्रकचालक अनिलकुमार छोटेलाल मित्रा आणि कार चालक वैजनाथ दादाराव कोंडगे हे दापोडी येथील पोलीस चौकी जवळ भांडत होते. दोघांच्या गाडीचा किरकोळ अपघात फुगेवाडी येथे झाला होता. कारचालकाने तीन भावासह एका मित्राला बोलावले आणि ट्रकचालकाला बेदम मारहाण केली. याची माहिती कंट्रोलरूममधून गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना तक्रार दाखल करण्यासाठी विनवणी केली. तेव्हा ट्रकचालक पोलिसांसोबत दापोडी चौकी येथे आला. परंतु, कारचालक तिथेच मित्रांसमवेत थांबला. त्याने मित्रांसोबत मिळून पुणे-मुंबई जुना महामार्ग रोखून धरला. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. फिर्यादी पोलीस शिपाई सचिन भागाजी आणि पोलीस कर्मचारी नरवडे हे त्याठिकाणी गेले असता तिघांनी नरवडे यांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले इसम पिंपरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच त्यांनी दबंगगिरी करत पोलिसांना बेदम मारहाण केल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -