घरमहाराष्ट्रउदयनराजे भोसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले; "मराठे आरक्षण मिळणार"

उदयनराजे भोसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले; “मराठे आरक्षण मिळणार”

Subscribe

सातारा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे आज साताऱ्यात आले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसलेंनी मनोज जरांगे पाटील यांची तलवार देऊन स्वागत केले. देशाचे तुकडे करू नका. नाही तर या खऱ्या अर्थाने देशाची वाट लागेल, अशी हात जोडून उदनयराजे भोसलेंनी राज्यकर्त्यांना हातजोडून कळकळीची विनंती केली.

उदयनराजे भोसलेंनी भेटीनंतर तुमच्या कानात कोणता कानमंत्री दिला, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “कानात दिलेला आशिर्वाद सांगायचा नसतो. ते मनात ठेवून लढायाचा असतो. मी महराजांच्या मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतला आहे. लढण्यासाठी शक्ती पाहिजे. या गादीने राज्यातील गोरगरीबांच्या पाठीवर हात फिरवला आहे. मराठ्यावर होणाऱ्या आरक्षणाला विरोध करण्यांविरोधात मी लढणार आहे आणि आरक्षण मिळवून दाखवणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : “जातीनिहाय जनगणना करा”; जरांगेच्या भेटीनंतर उदयनराजे भोसलेंची मागणी

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “महाराजांच्या वंशजांचा आशिर्वाद मिळणे आणि त्यातून आंदोलनाची दिशा ठरवू. आम्ही लढायला सज्ज आहोत, गोरगरिबाला न्याय देणार आहोत. याला कोणी कितीही विरोध केला तरी हे ठासून सांगतो, आम्ही मराठे आरक्षण मिळणार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई लुटू देणार नाही अन् महाराष्ट्र झुकू देणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा

जातीनिहाय जनगणना करा; उदयनराजे भोसलेंची मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “तुझे कुटुंब आहे, त्याला तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे. आज मला सांगा की, त्याकाळात शिवाजी महाराजांनी कधी कुठलाही भेदभाव केले नाही आणि कोणाला अंतर दिले नाही. एक व्यक्ती एवढे करू शकतो. हा कशामुळे हे सर्व करत आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणत्याही जातीचे समर्थन करत नाही. पण आज मनोज जरांगे पाटील मरायला तयार आहे. पण त्याने कशाला मरायचे. जातीनिहाय जनगणना करा आणि कोणावर अन्याया करू नका. जे कोणी असतील त्यांना आरक्षण द्या”, अशी मागणी उदयनराजो भोसले यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -