घरताज्या घडामोडीमराठा समाजातील ३५०० उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटणार

मराठा समाजातील ३५०० उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटणार

Subscribe

मराठा समाजातील सुमारे ३५०० विदयार्थ्यांना शासकीय आस्थापनेत नोकरी मिळूनही त्यांना नियुक्ती न दिलेल्या उमेदरावारांचा प्रश्न राज्य सरकाराने स्थापन केलेल्या उपसमितीच्या बैठकीत सकारात्मकरित्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिली. मराठा आरक्षण तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक हक्कांसंदर्भात आज राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री विजय वड्डेटीवर यांच्यासमवेत प्रविण दरेकर यांची बैठक पार पडली. या बैठकीला विनायक मेटे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सीताराम कुंटे, विधी व न्याय विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन स्थळी भेट दिली होती, याच दृष्टिकोनातून मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून वड्डेटीवर यांना दुसऱ्याच दिवशी पत्र पाठविले व संबंधीत विषयावर आज बैठक आयोजित केली. आजच्या बैठकी दरम्यान नीट समन्वय नव्हता, सरकार व अधिकारी यांचे बोलणे वेगळे होते, यावेळी मराठा समाजाच्या अन्याय झालेल्या काही विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडले व या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

हे वाचा – मनसेच्या मोर्चात भाजप कार्यकर्तेही होणार सहभागी

या बैठकीत विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी मराठा समाजाच्या उमेदवारांची भूमिका आक्रमकपणे मांडली. विभागाचे सचिव सिताराम कुंटे या विद्यार्थ्यांची या प्रश्नाची सध्या तातडी नसल्याचे मत मांडल्यानंतर दरेकर आक्रमक झाले, तुमची मुले काही न खाता उन्हा-तान्हात आंदोलनासाठी बसलेली चालतील का असा थेट सवाल केला. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध विषयासंदर्भात उपसमिती नियुक्ती केलेली असताना हा विषय या समितीमध्ये घेणे महत्त्वाचे होते, मग आज कशाला ही बैठक घेतली असा सवाल करतानाच मराठा समाजाच्या उमेदवारांवर अन्याय झाला असून त्यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, जर बैठकीत न्याय मिळत नसेल तर बैठक कशाला घेतली असेही दरेकर यांनी अधिका-यांना सुनावले. उमेदावाराच्या निर्णयासाठी विद्यार्थ्यांनी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागेल व त्या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन वड्डेटीवर यांनी दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -