घरमहाराष्ट्रMaratha Reservation: न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, पण आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी -...

Maratha Reservation: न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, पण आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी – खासदार संभाजीराजे

Subscribe

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे आपण भावूक झालो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी दिली. यासह सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले.

समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संभाजीराजे म्हणाले, ‘मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला होता. याबद्दल कायदा सुद्धा पारीत झाला होता. पण त्यानंतर ठरावीक लोकांनी विरोध केला होता. आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. पण, समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी आहे’

- Advertisement -

कोरोनाच्या परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक योग्य नाही

यासह सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करत संभाजीराजे यांनी असं आवाहन केलं आहे की, ‘, राज्यात सध्या कोरोनाची स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे.

दरम्यान,संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात नाराजीचा सूर आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -