घरमहाराष्ट्रMaratha Reservation : सारथीच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मूक आंदोलन करू,...

Maratha Reservation : सारथीच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मूक आंदोलन करू, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

Subscribe

सारथीबाबतच्या मागण्या अजित पवारांनी लवकरात लवकर पुर्ण कराव्यात.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राज्य सरकारकडून सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या होत नसतील तर मग पुन्हा मूक आंदोलन सुरु करणार असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहेत. ते आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होतो.

यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, १४ जुलैला सारथीच्या बोर्डची बैठक होणार आहे. या बैठकीत सारथीसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीसाठी लक्ष केंद्रीत करत १ हजार कोटींची मदत जाहीर करावी. ही मदत एकदम देणे शक्य नसल्यास सरकारने फेज १ फेज २, फेज ३ अशी टप्पाटप्याने करुन द्यावी. सारथीसंदर्भातील मागण्यांना १ महिना पूर्ण होत असल्याने सरकारने यावर लक्ष केंद्रीत करावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच सारथीच्या खर्चासाठी लागणारे पैसे अद्याप अर्थ मंत्रालयाकडून आले नाहीत. सारथीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने आठशे ते नऊशे कोटींची मागणी केली असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. तर लवकरांत लवकर अर्थ मंत्रालय आणि अजित दादांनी यावर लक्ष घालत ही आर्थिक मदत जाहीर करावी. असेही संभाजीराजे म्हणाले.

जेणे करुन कोल्हापूर, नाशिक, संभाजी नगर, नांदेडसह अनेक भागांत सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी मदत होईल. राज्य सरकारने दिलेली एक महिन्यांची मुदत संपत आली आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या परंतु सर्व ऑनपेपर येणे बाकी आहे. त्यामुळे बोर्ड मिटिंगमध्ये अनेक गोष्टी क्लीअर होतील. तोपर्यंत १ हजार कोटी रुपयांची मागणी सरकारने फेज १ फेज २ फेज ३ च्या माध्यमातून ताबडतोब पूर्ण करावी. अशी विनंतीपूर्व सुचना संभाजीराजेंनी केली आहे.

- Advertisement -

तसेच एमपीससीच्या प्रलंबित नियुक्त्या लवकरातं लवकरं पूर्ण कराव्यात. २१८५ विद्यार्थ्यांचा विषय मार्गी लावावा. त्यामुळे राज्य सरकारने बाकीचे विषय बाजूला ठेवत याविषयात लक्ष घालणे गरजेचा आहे. अजित पवार यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही साऱथी संस्था सुरुवात झाली. त्यामुळे कोल्हापूरातील मुख्यकेंद्र करत राज्यातील इतर भागांत उपकेंद्र सुरु झाल्यास स्वागत आहे. राज्य सरकारने सारथीच्या संपूर्ण १२ मागण्या केल्या आहेत. मात्र बोर्ड मिटिंग झाली पाहिजे होती ती काही कारणाने झाली नाही. मात्र सारथीसाठी लागणारी आर्थिक मदत जाहीर करणे राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या हाती आहे. यासाठी सारथीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने अर्थ मंत्र्यांकडे पहिल्या फेजमध्ये साडे आठशे कोटींची मागणी केली. परंतु या साडे आठशे कोटींमधील किती मदत देतात याकडे आमचे लक्ष असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी याविषयीवर बोलले नाहीत. ठराव मंजुर करुन मोकळे झाले सत्ताधारी…. सत्तेत नसलेल्या हा विषय मांडायला पाहिजे होता त्यांनाही तो मांडला नाही, मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा कधी काय करायचं हे आम्हाला माहित आहे. मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटील यांनी कसे आरक्षण मिळणार हे देखील मांडले. ते काही चुकीचे करतील असं मला वाटत नाही. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -