घरमहाराष्ट्रLIVE UPDATE : शहीद निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

LIVE UPDATE : शहीद निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Subscribe

शहीद जवान निनाद अनिल मांडवगणे यांचे पार्थिव नाशिकमधील त्यांच्या घरी दाखल झाले आहे. निनाद यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. श्रीनगरमधील बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत निनाद शहीद झाले. निनाद यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. काल रात्री उशिरा ओझर येथील विमानतळावर विशेष विमानाने आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -