घरताज्या घडामोडीPooja Chavan suicide : राठोडांच्या मागे भक्कमपणे एकनाथ शिंदे, मातोश्री बॅकफूटवर

Pooja Chavan suicide : राठोडांच्या मागे भक्कमपणे एकनाथ शिंदे, मातोश्री बॅकफूटवर

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राठोड यांना तूर्तास अभय!

बीडच्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला १० दिवस उलटल्यानंतरही वनमंत्री संजय राठोड नॉच रिचेबल आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्याशिवाय राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये आगोदर कारवाई केल्यास पक्षात आणि राज्यात चुकीचा संदेश जाईल अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यास सरसावलेली मातोश्री सध्या वेट आणि वॉचच्या भूमिकेत असून सध्यातरी राठोड यांना अभय मिळालेले आहेत.

बीड मधील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपांच्या गदारोळात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांना तूर्तास अभय देण्याचा निर्णय शिवसेनेच्या आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या कथित आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांकडून राज्य सरकारला अहवाल प्राप्त झाल्यानंतरच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत फैसला केला जाणार आहे. त्यामुळे आता संजय राठोड मंत्रिमंडळात राहणार का मंत्रिमंडळ बाहेर जाणार याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त यांच्या अहवालावर अवलंबून आहे. (Shivsena on backfoot after eknath shinde took stand in favour of Sanjay Rathod in alleged pooja chavan suicide case)

- Advertisement -

संजय राठोड हे राज्याचे वनमंत्री असून ते शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते आहेत. राठोड हे ज्या बंजारा समाजातून आले आहेत त्या बंजारा समाजाने राठोड यांना पाठिंबा दर्शवला आहे. अशा वेळी राठोड यांच्यावर केवळ आरोप झाल्यामुळे जर त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढले तर विदर्भात शिवसेनेला त्याचा मोठा फटका बसेल अशी भावना शिवसेनेतील एका मोठ्या गटाने व्यक्त केली आहे. तसेच शिवसेनेमध्ये वजनदार समजले जाणारे नगर विकास मंत्री व ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही राठोड यांच्या पाठीशी उभे राहात त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोध दर्शविला असल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत सर्वाधिक आमदार पाठीशी असलेले वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे अखेरीस काल पर्यंत संजय राठोड यांच्या राजीनामा घेण्याच्या निर्णयापर्यंत आलेल्या मातोश्रीला आज दुपारीच बॅकफुटवर जावे लागले आहे.

काही दिवसांनी होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्यात भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी आणि शिवसेनेची होणारी कथित बदनामी टाळण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा विचार शिवसेनेत बळावला होता. मात्र केवळ कथित आरोपामुळे आणि संशयाच्या गदारोळा वरून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला तर त्याचे वेगळे आणि चुकीचे संकेत राज्यभरामध्ये जातील आणि शिवसेनेला विदर्भात याचा मोठा फटका बसू शकेल असा सूर शिवसेनेच्या एका गटाने व्यक्त केला. त्यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय राठोड यांच्या राजीनामा ला विरोध दर्शविल्याने अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बॅकफूटवर जावे लागल्याची चर्चा मंत्रालय वर्तुळात आहे.

- Advertisement -

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तां कडून सविस्तर अहवाल मागवला असून त्या अहवालानंतरच पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्येचा उलगडा होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतरच संजय राठोड यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र तोपर्यंत तरी संजय राठोड यांना अभय देण्यात आले आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -