घरमहाराष्ट्ररविवारी मेगाब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनी 'हे' वेळापत्रक वाचाच!

रविवारी मेगाब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनी ‘हे’ वेळापत्रक वाचाच!

Subscribe

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील. 

येत्या रविवारी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

- Advertisement -

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

हार्बर मार्गावर सेवा रद्द

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणारी पनवेल/बेलापूर/वाशी करीता जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना महत्त्वाची सूचना

दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी- पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -