घरताज्या घडामोडीMhada Exam 2021 : म्हाडा परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक लवकरच

Mhada Exam 2021 : म्हाडा परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक लवकरच

Subscribe

म्हाडा आणि MPSC (एमपीएससी) ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच एमपीएससी समन्वय समितीनेही त्या दिवसाची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३ जानेवारी रोजी परिक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या परिक्षा देण्यास अडथळा येऊ नये यासाठी ही ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक म्हाडाच्या वेबसाईटवर जाहिर करण्यात येईल असे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी मुख्य परिक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ चा सुधारित वेळापत्रकानुसार २९ जानेवारी तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षकचा सुधारित ३० जानेवारी असा आहे. उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा प्राधिकरण या दोघांच्या परिक्षा देण्यास अडथळा येऊ नये याासाठी म्हाडा प्राधिकरणाची क्लस्ट ६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक – टंकलेखक या संवर्गाकरिता होणारी २९ जानेवारी आणि ३० जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परिक्षेचा सुधारीत दिनांक म्हाडा संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल. उर्वरीत क्लस्टर मधील परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

याआधीही म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा म्हाडाच्या परीक्षांच्या वेळेतच आल्याने म्हाडाला पेपर पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ आली. म्हाडाच्या परीक्षेच्या तारखा हा एमपीएससीच्या परीक्षेच्या दिवशीच आल्याने अखेर म्हाडाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची माफी मागितली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -