घरमहाराष्ट्रमंदिरं आणि हिंदू धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये - इम्तियाज जलील

मंदिरं आणि हिंदू धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये – इम्तियाज जलील

Subscribe

मंदिर मुद्द्यावरुन सेना-एमआयएम आमनेसामने

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमनेसामने आले आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करणार होते. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी “मी इथेच उभा आहे. मंदिरं कशी उघडतात ते बघतो. मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,” असं खुलं आव्हान जलील यांना दिलं. यावर इम्तियाज जलील यांनी मंदिरं आणि हिंदू धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये, असं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

“हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही. मंदिरं आणि हिंदू धर्माला कोणाही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावानं राजकारण करायचं असतं तेच असा वाद घालत असतात,” अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, इम्तियाज जलील मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तथापि, २ तारखेला मशिदी उघडणार, असा पवित्रा इम्तियाज जलील यांनी घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -