घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजपच्या बाईक रॅलीत मंत्री गिरीश महाजनांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना हेल्मेटसक्तीचा विसर

भाजपच्या बाईक रॅलीत मंत्री गिरीश महाजनांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना हेल्मेटसक्तीचा विसर

Subscribe

नाशिक : शहरामध्ये विना हेल्मेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात असतांना भाजपच्यावतीने स्वातंत्रयदिनी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत मात्र हेल्मेटसक्तीचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी गिरीश महाजन विना हेल्मेट रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महाजनांना याबाबत विचारले असता नाशिकमधे हेल्मेटसक्ती नाही, असे वाटल्याने हेल्मेट न घालता गाडी चालविल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

76 व्या स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नाशिकमधे भाजपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. गंगापूर रोडवरील शहिद स्मारक पासून रॅलीला सुरुवात झाली. पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर पुतळाजवळ रॅलीचा समारोप झाला. शहरात भाजपाने रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तर गिरीश महाजन यांच्यासह इतरही पदाधिकारी हेल्मेट न परिधान करता रॅलीत सहभागी झाले होते. त्यावर महाजन यांना विचारले असता सकाळपासून शहरात कोणी हेल्मेट घालून गाडी चालविताना दिसले नाही. नाशिकमधे हेल्मेटसक्ती नाही, असे वाटल्याने हेल्मेट न घालता गाडी चालविल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

आता पोलीस कुठे गेले?

त्यामुळे एकीकडे नाशिक शहरात शहर पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई सुरु असताना दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनीच पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढल्याचे यावरून दिसून आले. शहरात कुणीही हेल्मेट घालून गाडी चालवताना आढळून आले नसल्याचे सांगत नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये वाहनधारक कुणालाही न जुमानता वाहने चालवत असल्याचे महाजन यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -