घरमहाराष्ट्रआणि विधानसभेत मंत्र्यांचेच आवाज बंद!

आणि विधानसभेत मंत्र्यांचेच आवाज बंद!

Subscribe

नागपूरच्या पावसाळी अधिवेशनातील अडचणींचा पाढा काही थांबायला तयार नाही. आज अशी अडचण निर्माण झाली की, थेट मंत्र्यांचा आवाजच बंद झाला.

मोठा हट्ट करून सरकारने पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले. मात्र या अधिवेशनाला ग्रहण लागले की काय? असेच चित्र विचित्र प्रकार अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून घडत आहेत. सरकारला जसा पहिला आठवडा अडचणीचा ठरला तसाच दुसरा आठवडाही अडचणीचा ठरत आहे. विरोधकांनी कोणतीही आक्रमकता न दाखवताही सरकारमधील मंत्र्यांचा आवाज बंद झाला आहे. आत्तापर्यंत नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशनच घेतले जायचे. मात्र ऐनवेळी पावसाळी अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतल्यामुळे पावसाळ्यासाठी विधानभवन सज्ज नसल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहेत.

‘उद्याच्या उद्या खुर्ची नीट करा!’

सोमवारी रात्री एका विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार बोलायला उभे राहिले. मात्र त्याचवेळी वडेट्टीवार यांची खुर्ची तुटली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्यावर सभागृहाचे लक्ष वेधत सरकारला चांगलेच झापले. ‘उद्याच्या उद्या खुर्ची नीट करा!’ असा दमही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. यावेळी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता!

- Advertisement -

नवसाने पोर जन्मलं आणि मुके घेऊन मेलं!

काल खुर्चीचा प्रकार घडला आणि आज सकाळी विधानसभेतले माईकच बंद पडले. त्यामुळे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांना एका प्रश्नाचे उत्तर पर्यायी माईकवर द्यावे लागले. या प्रकारामुळे सभागृहात जाहीर सभेचे दृष्य निर्माण झाले होते. त्यानंतर कॉडलेस माईकची व्यवस्था करण्यात आली आणि मंत्री त्या माईकद्वारे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागले. नागपूर पावसाळी अधिवेशनाचा हा दुसराच आठवडा असून आणखी एक आठवडा बाकी आहे. उरलेल्या दिवसांमध्ये आणखी काय काय बघायला मिळेल, याची कल्पना नाही. नवसाने पोर जन्मलं आणि मुके घेऊन मेलं, अशीच परिस्थिती सध्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनाची झाली आहे.

Mahadeo Jankar
माईक बंद पडल्यामुळे कॉडलेस माईकचा आधार घेत उत्तर देणारे महादेव जानकर

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात नागपुरात कधी नव्हे असा धो-धो पाऊस पडला. परिणामी विधानभवनाच्या आवारात सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे दर्शन घडले. संपूर्ण विधानभवन परिसर जलमय झाला. परिमाणी विधानभवनातील वीज घालवावी लागली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधिमंडळाचे कामकाज वीज नसल्यामुळे ठप्प झाले होते. याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -