घरताज्या घडामोडीPUBG साठी आईच्या बँक खात्यावर डल्ला, अल्पवयीन मुलाने केले १० लाख लंपास

PUBG साठी आईच्या बँक खात्यावर डल्ला, अल्पवयीन मुलाने केले १० लाख लंपास

Subscribe

आई वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी मुलाला चांगलाच दम दिला आणि मुलगा रागाच्या भरात घर सोडून निघून गेला.

सध्या लहान मुलांमध्ये ऑनलाईन गेमच (Online Game) वेड आहे. लहान मुले मोबाईलवर PUBG गेम खेळण्यात तासंतास व्यस्त असतात. याच PUBG खेळामुळे मुंबईतील (Mumbai) एका कुटुंबाला तब्बल १० लाखांचा फटका बसला आहे. मुंबईच्या जोगेश्वरी (Jogeshwari) भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे PUBG गेम खेळण्याच्या नादात एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या बँक खात्यातील तब्बल १० लाख रुपयांवर डल्ला मारला. आई वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी मुलाला चांगलाच दम दिला आणि मुलगा रागाच्या भरात घर सोडून निघून गेला.

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथील दुर्गानगर भागात ही घटना घडली आहे. १६ वर्षांच्या मुलाने PUBG साठी आईच्या बँक खात्यातून १० लाख रुपये काढल्याचे आई वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला चांगलाच दम भरला होता. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा घर सोडून पळून गेला. मुलगा घरी नसल्याने आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मुलगा मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाचा तपास करत त्याचा शोध घेतला तेव्हा मुलगा अंधेरीच्या महाकाली गुंफा येथे फिरताना आढळला. पोलिसांनी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान मुलाने घर सोडून पळून जाण्याआधी आई वडिलांसाठी एक पत्र लिहिले त्यात असे लिहिले होते की, ‘मी PUBG गेम खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातील १० लाख रुपये उडवले. त्यामुळे आई बाबा मला रागावतील म्हणून मी घर सोडून जात आहे. आईचे पैसे मी पुन्हा कमावून दिल्यानंतर पुन्हा घरी येईन’.


हेही वाचा – तुम्हालाही घराचे आणि कारचे लोन भरणे जमत नाहीये का? मग ‘या’ अधिकारांबद्दल जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -