घरमहाराष्ट्रनाशिकभाजपचे माजी उपमहापौर सेनेच्या वाटेवर, खासदार राऊतांचा पहिलाच दौरा फलदायी

भाजपचे माजी उपमहापौर सेनेच्या वाटेवर, खासदार राऊतांचा पहिलाच दौरा फलदायी

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेत प्रथमेश गितेंनी भाजपातील स्वकियांना दिला धक्का

महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असल्याने राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे. मनसेने जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिककडे लक्ष केंद्रीत करत पहिल्याच दौऱ्यात भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांना गळाला लावले. गिते यांनी शनिवारी (दि.२८) राऊत यांची भेट घेतल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जातो आहे. मात्र, त्यांच्या या जाण्याने भाजपला धक्का बसला आहे.

गेल्या महिनाभरापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मनसेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये तळ ठोकत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्य पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राऊत यांनी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यांच्या आजच्या दौऱ्यात भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी त्यांची भेट घेतली. आपली भाजपमध्ये गळचेपी होत असून, बोलू दिलं जात नसल्याचा आरोप प्रथमेश गीते यांनी केला.

- Advertisement -

कोण आहेत प्रथमेश गिते?

माजी आमदार वसंत गीते यांचेप्रथमेश गीते हे सुपुत्र आहेत. ते माजी उपमहापौर असून भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. वसंत गिते हे नाशिकमधील वजनदार नेते आहेत. ते नाशिकचे महापौरपदीही राहिले आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वसंत गीते मनसेमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सहा महिन्यांपूर्वीच ते शिवसेनेत परतले. त्यानंतर आता प्रथमेशदेखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -