घरमहाराष्ट्रराज ठाकरे यांचं 'मिशन विदर्भ', १७ सप्टेंबरपासून जाणार दौऱ्यावर; जाहीर केला भरगच्च...

राज ठाकरे यांचं ‘मिशन विदर्भ’, १७ सप्टेंबरपासून जाणार दौऱ्यावर; जाहीर केला भरगच्च कार्यक्रम

Subscribe

मुंबई – शस्त्रक्रियेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी आता मिशन विदर्भ आयोजित केला असून १७ सप्टेंबरपासून आठवडाभर ते विदर्भात तळ ठोकून राहणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष आता महापालिका निवडणुकांकडे लागलं आहे. त्यामुळे मनसेनेही पुढाकार घेत निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.

राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षानेही निवडणुकासांठी रणनीती आखली असून राज ठाकरे यांनी एन्ट्री घेतली आहे. त्यानुसार, १७ सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.

- Advertisement -

असा असेल विदर्भ दौरा

  • १७ सप्टेंबरला नागपूर येथे रेल्वेने रवाना होतील.
  • १८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथे त्यांचं आमगन होईल. त्यानंतर, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी निवडणुकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
  • २० सप्टेंबरला १ दिवसीय चंद्रपू दौऱ्यावर जातील.
  • २१ सप्टेंबर रोजी अमरावती दौरा करतील.
  • २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतील.
  • २३ सप्टेंबर रोजी ते मुंबई येण्यासाठी रवाना होतील.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी झंझावाती महाराष्ट्र दौरा केला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात त्यांनी सभा घेत जनता आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं. लोकसभेत त्यांनी उमेदवार जाही केला नव्हता. मात्र, तरीही त्यांच्या सभांना तुफान गर्दी झाली. लोकसभा निवडणुकीच्या सभा म्हणजे विधानसभेतील प्रचारसभा असल्याची टीका त्यावेळी झाली होती. तसंच, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी जोरदार मुसंडी मारली. मात्र, विधानसभेत त्यांना केवळ एकच जागा मिळाली. कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार राजू पाटील जिंकून आले.

- Advertisement -

दरम्यान, आता महापालिका निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या आगामी निवडणुका काबीज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली आहे. तसंच, येत्या निवडणुकीत ते भाजपासोबत जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे-भाजपा युती होतेय का हे पाहावं लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -