घरताज्या घडामोडी'चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत'; 'हर हर महादेव'वर अमोल मिटकरींचा आक्षेप

‘चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत’; ‘हर हर महादेव’वर अमोल मिटकरींचा आक्षेप

Subscribe

मराठीतील ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक चित्रपट 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला आला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटात सह्याद्रीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज आहे.

मराठीतील ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक चित्रपट 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला आला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटात सह्याद्रीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज आहे. राज ठाकरेंच्या कणखर आवाजातील टीझर पाहूनच प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. मात्र, आता या ‘हर हर महादेव’ चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. मिटकरी यांनी ट्विट करुन हा आक्षेप नोंदवला. “सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. (Mla Amol Mitkari Has Objected on Har Har Mahadev marathi movie)

”VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

“अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभू यांची शब्दफेक व जेधे-बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही”, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

सध्या या चित्रपटाचे 400 चित्रपटगृहांमध्ये, पाच भाषांमध्ये 1200 शो सुरू आहेत. हे सर्व शोज् हाऊसफुल्ल असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी अशी मोठी धडाकेबाज कमाई केली. पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठणे ही मोठी बाब आहे, त्यामुळे प्रतिसाद अजून वाढला तर या चित्रपटाचे आणखी काही शो लावण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकारांनी अभिनय केला आहे.


हेही वाचा – इराकच्या फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -