घरताज्या घडामोडीNitesh Rane : नितेश राणेंच्या वकिलांचा जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला, सरकारी वकील...

Nitesh Rane : नितेश राणेंच्या वकिलांचा जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला, सरकारी वकील बाजू मांडणार

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. सोमवारी नितेश राणेंच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला असून आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. यानंतर न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.

आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली आहे. यानंतर आता दुपारी २.४५ वाजता सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचाही सहभाग होता असा आरोप करण्यात येत आहे. नितेश राणेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्यास सांगितले होते. त्यानुसार नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत.

आमदार नितेश राणे यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरु आहे. जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला होता त्यामुळे नितेश राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होते. हायकोर्टातही नितेश राणेंचा अर्ज फेटाळण्यात आला होता. नितेश राणेंच्या वकिलांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळत जिल्हा न्यायालयात नितेश राणेंना १० दिवसांत शरण जाण्याचे निर्देश दिले होते. या १० दिवसांत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. सोमवारी नितेश राणेंच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला असून आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. यानंतर न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.

नितेश राणेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

नितेश राणेंच्या वकिलांनी असे म्हटलं आहे की, नितेश राणे त्यांच्या स्वीय सहायकासोबत कितीही वेळा बोलू शकता. मी स्वतः माझ्या वकिलांशी दिवसातून जास्त वेळा बोलत असतो. नितेश राणे हे प्रसिद्ध व्यक्तीमहत्त्व आहे. त्यांचे अनेकांनी बोलणं होत असते. त्यांचा वावर बऱ्याच ठिकाणी असतो. अशामुळे त्यांचा आरोपींशी फोटो आहे याचा अर्थ असा होत नाही की ते त्यांच्या जवळचे आहे. नितेश राणेंकडून पोलिसांना सहकार्य मिळाले आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे. आता सरकारी वकील प्रदिप घरत यांच्याकडून युक्तिवाद करण्यात येईल. यानंतर न्यायालय काय निर्णय देईल हे स्पष्ट होईल.

- Advertisement -

हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंचा पीए राकेश परब कणकवली पोलिसांना शरण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -