घरताज्या घडामोडीसत्तेसाठी आमदारांनी सोडला पक्ष तर शिवसेनेसाठी शिक्षकाने सोडली नोकरी!

सत्तेसाठी आमदारांनी सोडला पक्ष तर शिवसेनेसाठी शिक्षकाने सोडली नोकरी!

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यापासून सत्तासंघर्ष सुरू आहे. ज्या शिवसेनेने अनेकांना ओळख दिली, तीच मंडळी आता शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी आमदारांनी शिवसेना सोडली आहे. तर एका शिक्षकाने शिवसेनेसाठी नोकरी सोडली आहे. दरम्यान, बंडखोरांवर पुण्यातील एका सामान्य शिक्षकाने चपराक लावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक आजी-माजी मंडळी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत आहेत. परंतु ही गळती सुरू असतानाच पुणे जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी शिक्षक पदाचा राजीनामा देत पूर्ण वेळ शिवसेनेला देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिल्याचेही पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शनवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवून शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे दिपक खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.

- Advertisement -

दिपक खरात हे वालचंदनगर इंडष्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात २००२ पासून शिक्षक म्हणून सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र.३ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यन्त २० वर्ष ६ महिने इतकी सेवा केलेली आहे.


हेही वाचा : शिंदे आणि फडणवीस यांचे अखेर ठरले : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -