घरताज्या घडामोडीओरिजनल शिवसेना आमचीच, शिंदे-फिंदे गट काय नाय.., आमदार संतोष बांगर यांचा दावा

ओरिजनल शिवसेना आमचीच, शिंदे-फिंदे गट काय नाय.., आमदार संतोष बांगर यांचा दावा

Subscribe

परभणी: शिवसेना नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. सुप्रीम कोर्टात यावर आज सुनावणी झाली. परंतु पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग जो निर्णय घेईल, तोच निर्णय अंतिम असेल असा निर्णय देण्याता आला आहे. दरम्यान, शिंदे गट, फिंदे गट काय नाय, ओरीजनल शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

संतोष बांगर यांनी परभणीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, लोक आम्हाला म्हणत असतील गट-तट, शिंदे गट कोणता गट?, शिंदे गट- फिंदे गट काय नाही. ओरीजनल शिवसेना आमचीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ, असं संतोष बांगर म्हणाले.

- Advertisement -

आजपासून आपण एक संकल्पना करायची. या परभणी जिल्ह्यावरती आणि शहरावरती छत्रपती शिवरायांचा भगवा फडकवायचा आहे. हे लोक आपल्याला म्हणत असतील गट तट, पण नाही, शिंदे गट, फिंदे गट काय नाही, ओरीजनल शिवसेना आमचीच आहे, असं संतोष बांगर म्हणाले.

पुढे बोलताना देखील संतोष बांगर म्हणाले की, मी महादेवाचा भक्त आहे. तुम्ही पाहिली असेल माझी कावड यात्रा. मी त्या कावड यात्रेमध्ये ज्या-ज्या वेळेस महादेवाला जे मागितलं, ते १०० टक्के मला भेटल्याशिवाय राहिले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते आणि..,अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -