घरमहाराष्ट्रMLC Election : शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेसाठी भरला उमेदवारी...

MLC Election : शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेसाठी भरला उमेदवारी अर्ज

Subscribe

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या जागी सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका स्वराज्य संस्थामधून शिवसेनेचा एक आमदार विधान परिषदेवर पाठवला जातो. या जागी रामदास कदम यांना २०१६ साली पाठवण्यात आलं होतं. शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या जागेवर सुनील शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

- Advertisement -

सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे. दरम्यान, आज सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. २००७ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. २०१४ मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत ६० हजार ६२५ मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना ३७ हजार ६१३ मतं मिळाली होती. २०१५ मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -