घरताज्या घडामोडीमुंबई लोकलमधून थेट मेट्रोतच !

मुंबई लोकलमधून थेट मेट्रोतच !

Subscribe

मुंबई मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेतील कनेक्टिव्हिटीसाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कनेक्टरची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जवळपास उपनगरीय लोकलच्या स्थानकांवर एमएमआरडीएमार्फत ही कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एमएमआरडीएने शहरात इंटरचेंजच्या सुविधेसाठी सविस्तर डिझाईन तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हार्बर मार्ग तसेच मोनोरेल कनेक्टिव्हिटीसाठी हे इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सध्याचे हार्बर मार्गावरील मेट्रो स्टेशन तसेच मेट्रो २ ब प्रकल्पाअंतर्गत इंटरचेंजच्या सुविधेसाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मेट्रो २ ब प्रकल्पाअंतर्गत (डी एन नगर ते मंडाले) या प्रकल्पाअंतर्गत चेंबूर या स्टेशनची कनेक्टिव्हिटीही देण्यात येणार आहे. तसेच मोनोरेलच्या वीएनपी आणि आर सी मार्ग मोनोरेल स्टेशनअंतर्गत ही इंटरचेंजची सुविधा देण्यात येणार आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पाअंतर्गत गांधी नगर येथे इंटरचेंजची सुविधा देण्यात येईल. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो ६ प्रकल्पाअंतर्गत कांजुरमार्ग आणि शास्त्री नगर मेट्रो स्टेशन येथे कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. शास्त्री नगर येथे दहिसर ते डी एन नगर या मेट्रो २ अ च्या स्टेशनसाठीही इंटरचेंजची सुविधा देण्यात येणार आहे. इंटरचेंजची सुविधा देण्यासोबतच एमएमआरडीए मेट्रो स्टेशनसाठी मल्टी मोडल इंटिग्रेशनची सुविधा देऊ पाहत आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीए मेट्रो २ अ तसेच मेट्रो ७ प्रकल्पासाठी ३५६.८६ कोटी रूपये खर्च करणार आहे. यामध्ये सायकल ट्रॅक, मोठे फुटपाथ, रस्त्यांसाठीच्या लगतच्या जागेसाठीच फर्निचर, पथदिवे आणि बस स्थानकाची सुविधा अशा गोष्टींसाठी पैसे खर्च करण्यात येणार आहे. एकुण ३० स्टेशनसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पातील ३० टक्के खर्च महापालिका देणार आहे. तसेच या सगळ्या सुविधांची देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारीही महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येईल. नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत एमएमआरडीएने मेट्रो स्थानकांच्या बाबतीत धोरण निश्चित करत स्थानकांच्या ठिकाणी थेट प्रवेशासाठीचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -