घरमहाराष्ट्रमुजोर टोलनाक्याला मनसे दणका, रुपाली पाटील यांची फास्ट टॅगवरुन वादावादी

मुजोर टोलनाक्याला मनसे दणका, रुपाली पाटील यांची फास्ट टॅगवरुन वादावादी

Subscribe

रस्ता तुमच्या बापाचा आहे का? आमच्या महाराष्ट्रात येऊन तुम्ही कमवता?

मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची रात्री किणी टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे झालेल्या वाहतूक कोंडीवरुन वाद झाला. मनसे नेत्या रुपाली पाटील या रात्री किणी टोलनाक्यावर पोहोचल्या तेव्हा प्रचंड वाहतूक कोंडी टोल नाक्यामुळे झाली होती. फास्ट टॅग सुरु होण्यास काही तासांचा वेळ होता परंतु फास्ट टॅग प्रणालीमुळे ५ ते ६ किलोमीटल लांब वाहनांच्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी मनसे स्टाईलने वाहतूक सुरळीत केली आहे. यावेळी किणी टोलनाक्यावर मनसे नेत्या रुपाली पाटील आणि टोलनाका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली आहे.

मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या किणी टोलनाक्याच्या दिशेने प्रवास करत होत्या यावेळी टोलनाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासीही संताप व्यक्त करत होते. रुपाली पाटील आणि त्यांचे समर्थकांनी टोल नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना याबाबत खडसावून जाब विचारला आणि वाहनांचा जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली. परंतु टोल नाक्यावरील कर्मचारी वाहनांना सोडत नव्हते.

- Advertisement -

रुपाली पाटील यांनी टोल नाका कर्मचाऱ्यांना खडसवायला सुरुवात केल्यावर वाहतूक कोंडीतील वाहन धारकांनीही रुपाली पाटील यांना पाठबळ दिले. रस्ता तुमच्या बापाचा आहे का? आमच्या महाराष्ट्रात येऊन तुम्ही कमवता? २ मिनीटांपेक्षा अधिक वेळ गाडी थांबवताच कशी मागे ५ ते ६ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. असा दम मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी टोल नाक्यावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरला. सुरुवातीला कर्मचारीही रुपाली पाटील यांची हुज्जत घालत होते. परंतु काही वेळानंतर टोलनाक्यावरील वाहनांना सोडण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी रुपाली पाटील ठोंबरे यांनी फास्ट टॅग प्रकरणी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -