घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, हातात मोबाईल घेऊन लेक-सून आणि नातवाचा काढला...

राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, हातात मोबाईल घेऊन लेक-सून आणि नातवाचा काढला फोटो

Subscribe

राज्यात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोना संकटाच्या २ वर्षानंतर गणरायाचं आगमन होत असल्याने यावर्षी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरात शिवतीर्थावर पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे ठाकरे परिवारामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर राज ठाकरेंना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. राज ठाकरेंनी हातात मोबाईल घेऊन लेक-सून आणि नातवाचा फोटो काढला.

राज ठाकरे नुकतेच शिवतीर्थ निवासस्थानी राहायला गेले आहेत. नवीन वास्तूत गणपती बाप्पांचं पहिल्यांदा आगमन झालंय. त्यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्षात ठाकरे कुटुंबात नातवाचं आगमन झालंय. अमित-मिताली यांना ५ एप्रिल रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. कियान असं त्यांनी आपलं मुलाचं नाव ठेवलंय.

- Advertisement -

आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबात बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळाली. नातवंडाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून राज ठाकरेंना त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वत: मोबाईल हातात घेऊन लेक-सून आणि नातवाचा फोटो काढला.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या दिल्या

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -