घरमहाराष्ट्र.. तर मनसे स्टाईलने आंदोलन

.. तर मनसे स्टाईलने आंदोलन

Subscribe

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला इशारा

दिलेल्या मुदतीत खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल व त्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांवर राहील, असा निर्वाणीचा इशारा पक्षाचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिला आहे.

गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा बट्ट्याबोळ झाल्याने पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या पट्ट्यात असंख्य खड्डे पडले आहेत. प्रवासी व वाहनचालक वैतागून गेले आहेत. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराच्या मनमानीने रस्त्याची दैना उडाली आहे. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी वडखळ येथे खड्डे मोजण्याची अभिनव स्पर्धा मनसेने आयोजित केली होती. मनसेच्या या पवित्र्याने हादरलेल्या प्राधिकरणाने तात्काळ महामार्गाचे अभियंता नागराज राव यांना तेथे धाडले. यावेळी राव यांनी येत्या २५ ऑगस्टपर्यंत खड्डे भरण्याचे, तसेच पाऊस थांबताच रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

- Advertisement -

यावेळी पोलसानी यांच्यासह वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, सरचिटणिस राहुल चव्हाण, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष शालोम पेणकर, अलिबाग तालुका अध्यक्ष देवव्रत पाटील, मनोहर पाटील, गौतम मोरे, विनोद गांवड आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोजलेल्या अवघ्या काही अंतरात १५ हजार ९२० इतके जिवघेणे खड्डे आढळून आले. यापैकी काही खड्डे चक्क १० फूट लांब, ८ फूट रूंद व ३ फूट खोल, तसेच ७ फूट लांब, ९ फूट रूंद व २ फूट खोल असल्याचे आढळून आले. या खड्ड्यांमुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. मनसेने या महामार्गाचे नामकरण देवेंद्र ते नरेंद्र मार्ग असे केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -