Monsoon: राज्यात पावसाचा जोर कायम, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ नद्या सध्या इशारा पातळीवर

Monsoon: Rains continue in the state, rapid rise in river water levels in satara,sangli,kolhapur,konkan
Monsoon: राज्यात पावसाचा जोर कायम, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

राज्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. कोल्हापूर, सातारा,सांगली,रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत गेल्या १२ तासात ३ फुटांनी वाढ झालीय. कोल्हापूर जिल्ह्यातील ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २३ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून सुमारे २१०० क्युसेक पाणाच्या विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या २५ हजारांपेक्षा जास्त क्युसेस पाण्याची आवक होत आहे. तर कोकणातील अनेक गावात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झापाट्याने वाढ झाल्याने अनेक नद्यांवरिल पूल पाण्याखाली गेले आहेत. जगबुडी,वशिष्ठी,काजळी,कोदवली यांसारख्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आठ नद्या सध्या इशारा पातळीवर आहेत. (Monsoon: Rains continue in the state, rapid rise in river water levels in satara,sangli,kolhapur,konkan)

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत अनेक गावांतील घरामध्ये पाणी शिरले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दापोली, मंडणगड,लांजा,राजापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.

मुंबईसह कोकण आणि पालघर जिल्ह्याला सध्या रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरातही पावसाचा जोर कायम. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच धोक्याची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे NDRFची टीम तैनात होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोल्हापूरात पुन्हा पूर सदृष्यजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही  वाचा – राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिक्षकांना रेल्वे प्रवासी मुभा