घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र७६ वर्षीय वृद्धाची गतीमंद जबरदस्ती

७६ वर्षीय वृद्धाची गतीमंद जबरदस्ती

Subscribe

पंचवटी : आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरण ताजे असतानाच आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका ७६ वर्षीय वृद्धाने गतिमंद मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर महादू सुर्यवंशी असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीचे कुटुंब हे आडगाव पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास आहे. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (दि.२८) पीडित युवतीची आई तिच्या लहान बहिणीस घेऊन भाच्याच्या लग्नाला गेली होती. त्यावेळी शेजारील काही नागरिकांनी कॉल करुन तिच्या संपर्क साधला. तुमच्या गतिमंद मुलीसमवेत संशयित मधुकर सूर्यवंशी याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानुसार पीडित युवतीच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात येत वृद्धाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सूर्यवंशीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -