पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 दिवसांनंतर संजय राऊत यांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

shiv sena sanjay raut target maharashtra govt eknath shinde devendra fadnavis over security

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. (MP Sanjay Raut granted bail)

कथित पत्राटाळ जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत हे तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर संजय राऊत यांना पहिले ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ईडीकडून संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यास विरोध करण्यात येत असून न्यायालयात अॅडव्होकेट अनिल सिंग हे ईडीची बाजू मांडत आहेत.

शिवसेना भवनात जल्लोष साजरा करणार

जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. या जामीनानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच आज संध्याकाळी पाच वाजता शिवसेनाभवन येथे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.

संजय राऊतांवरील ईडीचा आरोप

  • संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते.
  • त्यावेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले.
  • यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले.
  • या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली.
  • पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असा ईडीचा आरोप आहे.
  • या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते.
  • यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – ज्या सरन्यायाधीशांसमोर पहिल्यांदा युक्तिवाद केला, त्यांच्याच मुलाची लळित यांनी केली शिफारस