घरमहाराष्ट्र'अशा' चित्रपटांसाठी इतिहासतज्ज्ञांची समिती नेमा, आमदार सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘अशा’ चित्रपटांसाठी इतिहासतज्ज्ञांची समिती नेमा, आमदार सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

ठाणे : वारंवार ऐतिहासिक चित्रपटांवरून वादंग होत असतात. आताही ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून वाद सुरू आहे. त्यामुळे महापुरुषांच्या जीवनावर आधारीत तसेच ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासतज्ज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना एक निवेदन दिले आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मान्यतेनंतरच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर योग्य इतिहास जाईल आणि वाद-विवाद होऊन चित्रपटनिर्मात्यांचे नुकसान होणार नाही. याशिवाय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होईल, असे आमदार सरनाईक यांनी या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे चित्रपटांवर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून दाखवलेली गोष्ट त्यांच्या मनावर प्रभाव टाकून जाते. आपल्या देशातील अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांनी अत्यंत नाजूक आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारे विषय चित्रपटांच्या माध्यमातून मांडले आहेत व लोकांच्या मनावर त्याचा खोलवर परिमाण पाहायला मिळाला आहे, असे आमदार सरनाईक यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

इतिहासावर देखील हिंदी असो अथवा मराठी सिनेसृष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुंदर चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, बाळ भीमराव, पावनखिंड, तान्हाजी, फर्जंद, शेर शिवराज असे अनेक सुंदर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगून सरनाईक म्हणाले की, आपण स्वतः निर्माता, आमदार आणि चित्रपटांचा चाहता असल्यामुळे काही गोष्टी निरीक्षणास आणून देऊ इच्छितो. अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते हे अत्यंत मेहनतीने आणि स्वच्छ हेतूने ऐतिहासिक चित्रपट बनवीत असतात. परंतु, बऱ्याच वेळी सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यावरही काही संघटना, पुढारी यांच्याकडून आक्षेप घेतला जातो आणि चित्रपटांचे शो बंद पाडले जातात. ते योग्य की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्यामुळे निर्मात्यांचे खूप मोठे नुकसान होते, तसेच प्रेक्षकांच्या मनातही संशय निर्माण होतो.

आगामी ’हर हर महादेव“ आणि ’वेडात मराठे वीर दौडले सात“ या चित्रपटांविषयी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले व छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असेही त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज अथवा महापुरुष असोत हा भावनिक विषय आहे. यावर तोडगा म्हणून महापुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवताना राज्य शासनाने ’इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी मागणी करत आहोत. या समितीच्या मान्यतेनंतरच चित्रपट प्रदर्शित होतील. त्यामुळे लोकांसमोर योग्य इतिहास जाईल व वाद-विवाद होऊन चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होणार नाही. तरी सुध्दा कोणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास चित्रपटांना राज्य सरकारच्या माध्यमातून संरक्षण मिळेल, असे सरनाईकांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -