घरताज्या घडामोडी'जिम सुरु करा' राज ठाकरें पाठोपाठ सुप्रिया सुळेंची मागणी

‘जिम सुरु करा’ राज ठाकरें पाठोपाठ सुप्रिया सुळेंची मागणी

Subscribe

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक असल्याची मागणी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. कारण राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे’, असे ट्विट करत सुप्रिया सुळेंनी जिम सुरु करण्याची मागणी केली आहे.

काय केले ट्विट?

सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी तेच पत्र ट्विटरवर शेअर करत जिम उघडण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी ‘जिम ओपन करा, बघू काय होते’, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता सर्वच नेत्यांकडून जिम उघडण्याची मागणी केली जात आहे.


हेही वाचा – पंतप्रधानांना पत्र लिहून स्वत:वर गोळी झाडून तरुणीने केली आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -