‘एमपीएससी’कडून मोबाईल अॅपची निर्मिती, सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर

राज्य लोकसेवा आयोगाने 'एमपीएससी' (MPSC) नावाचे फेज - २ चे ॲप लाँच केले आहे. या अॅपच्या (Mobile App) माध्यमातून एमपीएससीच्या पदभरती परीक्षांची माहिती उमेदवारांना मिळणार आहे.

Results of departmental pre-examination for the post of Sub-Inspector of Police announced

राज्य लोकसेवा आयोगाने ‘एमपीएससी’ (MPSC) नावाचे फेज – २ चे ॲप लाँच केले आहे. या अॅपच्या (Mobile App) माध्यमातून एमपीएससीच्या पदभरती परीक्षांची माहिती उमेदवारांना मिळणार आहे. एकाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार असल्याने एमपीएसची परीक्षा देणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सध्यस्थितीत विविध पदांच्या जाहिराती, परीक्षा, अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सर्व माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावरून दिली जात आहे. (MPSC launch Mobile App for all information of exams)

एमपीएससीने आता मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून, विविध भरती प्रक्रिया, परीक्षा आदींबाबतची माहिती उमेदवारांना त्याद्वारे मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरण्याची सुविधाही ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकणार आहे. सध्याच्या युगात मोबाईलचा वापर अधिक वाढल्याने सर्व माहिती एका मोबाईल अॅपमध्ये दिल्यास एमपीएसीच्या उमेदवारांसाठी सुलभ ठरणार आहे, याचाच विचार करत ‘एमपीएससी’ या स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा – MPSC Result : एमपीएससीचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

सध्या अँड्रॉईड प्रणालीसाठीचे ॲप (Android App) विकसित करण्यात आले आहे. तर आयओएस प्रणालीसाठीचेही ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली. दरम्यान, उमेदवारांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना सध्या अर्ज करण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. त्यामुळे उमेदवाराकडे संगणक किंवा लॅपटॉप नसल्यास सायबर कॅफेत जावे लागते. मात्र आता ॲपद्वारे उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवरच सर्व माहिती मिळेल.

उमेदवारांना उत्तर देण्यास टाळाटाळ

एमपीएससीच्या उमेदवारांनी काही अडथळे आल्यास त्यांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती उमेदवारांकडून वारंवार दिली जात आहे. अनेकदा उमेदवारांनी पाठवलेल्या ई मेलला उत्तर दिले जात नाही, कॉल सेंटरकडून व्यवस्थितपणे माहिती दिली जात नाही. त्यामुळे याच्याकडेही एमपीएससीने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ॲपअंतर्गत उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती उमेदवारांना मिळायला हवी. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही असावी, अशा अनेक तक्ररी वजा मागण्या एमपीएससीच्या उमेदवारांकडून केल्या जात आहेत.


हेही वाचा – Partygate Scandal: बोरिस जॉन्सनच राहणार UK चे पंतप्रधान, 359 खासदारांपैकी 211 खासदारांचा पाठिंबा